सातारा वनविभागाच्या वतीने कासची नाईट सफारी सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून कास धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे ही नाईट सफारी सध्या तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात लाखो भाविक कित्येक दिवस पायी चालत त्या विठूरायाच्या दर्शनाला जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन मिळेपर्यंत या दिवशी अतिशय भक्तीभावाने उपवास करतात. प्रत्येकाला वारीला जायला जमतेच असे नाही. पण विठ्ठलावर असलेली भक्ती आणि मोठी एकादशी म्हणून आपण हा आषाढी एकादशीचा उपवास आवर्जून करतो. एकादशी दुप्पट खाशी असं आपल्याकडे उपहासाने म्हटलं जातं. मात्र तसं न करता तब्येतीला झेपेल असा आहार घ्यायला हवा. आता उपवास म्हटल्यावर रोजच्यापेक्षा आहारात थोडे बदल केले जातात. पण ऐन पावसाळ्यात आषाढीचा उपवास करताना आहाराबाबत काळजी घ्यायला हवी (Fasting Diet Tips). पावसाळ्यात पचनशक्ती क्षीण होत असल्याने तसेच वात किंवा गॅसेसच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याने पुरेशी काळजी घ्यायला हवी.
महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातील काही अधिकारी यांना आर्थिक फायदा होईल असे बेकायदेशीर शासन निर्णय निर्गमीत करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय पुर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहेत. या बाबतीत सर्वोच्च न्यायालय तसेच मॅट ने सदरचे शासननिर्णय रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे असे शासन निर्णय काढणार्या व ते शासनदरबारी मांडून मंजूर करुन घेणार्या अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी. तांत्रिक मुद्दा मांडून या अधिकार्यांनी शासनास गरज असलेचे चुकीचे भासवले आहे. आवश्यकता नसताना अशा प्रकारचे अनेक वैद्यकीय व वरिष्ठ अधिकारी या राज्यात उपलब्ध असताना आर्थिक तडजोड व फायद्यासाठी काही ठराविक अधिकार्यांना फायदा होईल असे कृत्य झालेले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य अधिकार्यांमध्ये असंतोष पसरुन असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामन्यांच्या आरोग्य सेवा आणि कामकाजावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. या शासननिर्णयाचा फायदा घेणारा व त्यास मदत करणार्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यांचे सर्व मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. शासननिर्णय न्याय प्र. 3018/प्र.क्र.254/सेवा-2 दि. 31/05/2021 हा निर्णय मॅट दाखल केलेल्या याचिका क्र. 639/21 दि. 04/01/2022 च्या निकालाने रद्द केलेला आहे. असे असतानाही त्यांवर अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेचे आजअखेर दिसून येत नाही. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी शासनाने या संदर्भातील घेतलेले सर्व शासननिर्णय रद्द करण्यात यावे, असे आदेश पारित केलेले आहेत. सदर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झालेमुळे त्यावर अवमान याचिका क्र. 17784/2020 दाखल केलेले होते. त्यावर न्यायालयाने उच्चन्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा निर्णय कायम केलेला आहे असे असताना सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई वरील तिन्ही आदेशांची अंमलबजावणी केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग न्यायव्यवस्था मानत नाही का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
येथील तहसिल आवारात पहिल्या मजल्यावर असणार्या शासकीय कार्यालयातून अज्ञात चोरट्याने 28 हजार रुपये किंमतीच्या चार बॅटर्या चोरुन नेल्या.
येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच एकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील विसावा नाका (पिरवाडी), ता. सातारा व येथील खेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील मोळाचा ओढा परिसरात दारुच्या नशेत पडून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सांगवी, ता. कोरेगाव येथील एका युवतीने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हद्दीत अजंठा चौक परिसरात असणार्या उड्डाण पुलाला भगदाड पडले असल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकू लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षात मात्र या महामार्गाच्या देखभालीचे काम करणार्या रिलायन्स कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावत पावसाळ्याच्या दिवसात नियमितपणे केले जाणारे हे काम असल्याचे सांगितले.