maharashtra

विषारी औषध प्राशन केलेल्या युवतीचा मृत्यू


Death of a young woman who was poisoned
सांगवी, ता. कोरेगाव येथील एका युवतीने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

सातारा : सांगवी, ता. कोरेगाव येथील एका युवतीने विषारी औषध प्राशन केल्याने तिचा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 27 जून रोजी सांगवी गावच्या हद्दीत शेतामध्ये तेथीलच उत्कर्षा सुनिल सुतार (वय 18) हिने विषारी औषध प्राशन केल्याने तिला प्रथम सातारा येथील खाजगी रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची खबर डॉ. साळुंखे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.