तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील समीर बाबूराव उबाळे या मागासवर्गीय कुटूंबाचे घर पडून हे कुटूंब पूर्णतः बेघर होऊन रस्त्यावर आले.
येथील प्रभाग क्रमांक १५ मधील गीतांजली विद्या मंदिरा शेजारील सार्वजनिक स्वछ्तागृहाची भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पालिकेचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
येथील एका डोळ्याच्या रुग्णालयापुढे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील तामजाई नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेची चार जणांनी ५ लाख ५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून २३ हजार ८०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
जगमीन, ता. सातारा येथील एक जण सातारा बसस्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील तडीपार केलेल्या एकास क्षेत्रमाहुली परिसरात सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.
अनुदानित शाळांसाठी विवेकानंद अकॅडमी या शाळेकरीता नजीकच्या शाळेचे अंतर 1 किलोमीटर असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही शिक्षण विभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे, असे श्री सारदादेवी चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती शकुंतला काटकर यांनी सांगितले.
नॉर्थरडॅम येथे खुल्या गटात पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकावले आहे. बेनॉइट एच या फ्रान्सच्या खेळाडूचा 6-2,7-5 अशा सरळसेटमध्ये पराभव करून विश्वजीतने विजेतेपद खेचून आणले.