खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून २३ हजार ८०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
सातारा : खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत पोलिसांनी दारू अड्डयावर छापा टाकून २३ हजार ८०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.६ जून रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खेड गावच्या हद्दीत महामार्ग लगत असलेल्या महिंद्रा हॉटेलच्या काउंटरखालुन विनोद यशवंत बोडरे, रा. वर्धनगड, ता. खटाव हा विदेशी दारूच्या बाटल्या विकत असताना आढळून आला. त्याच्याकडून २३ हजार ८०० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.


