maharashtra

सातारा येथे जबरी चोरी


Robbery at Satara
येथील एका डोळ्याच्या रुग्णालयापुढे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील एका डोळ्याच्या रुग्णालयापुढे रस्त्यावर जबरी चोरीची घटना घडली असल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ५ जुलै रोजी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बोकील आय क्लिनिक समोर रस्त्यावरून पायी चालत जात असलेल्या संजना राजेंद्र परुळकर, रा. गुरुवार पेठ, सातारा या रस्त्याने चालत जात असताना दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरुन येत पर्स हिसकावली. पर्समध्ये रोख 4300, मोबाईल, कागदपत्रे, चष्मा, सोन्याचा मणी असे साहित्य होते.