maharashtra

तडीपार गुंडास अटक


Tadipar goons arrested
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील तडीपार केलेल्या एकास क्षेत्रमाहुली परिसरात सातारा शहर पोलिसांनी अटक केली.

सातारा : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील तडीपार केलेल्या एकास क्षेत्रमाहुली परिसरात सातारा शहर पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय संभाजी आढाव, वय २१, रा. क्षेत्रमाहुली याला उपविभागीय दंडाधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तरीही तो क्षेत्रमाहुली गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावला. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तो आढळून आल्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, अभय साबळे, सागर गायकवाड, संतोष कचरे, गणेश घाडगे यांनी केली.