येथील प्रभाग क्रमांक १५ मधील गीतांजली विद्या मंदिरा शेजारील सार्वजनिक स्वछ्तागृहाची भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पालिकेचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
सातारा : येथील प्रभाग क्रमांक १५ मधील गीतांजली विद्या मंदिरा शेजारील सार्वजनिक स्वछ्तागृहाची भिंत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पालिकेचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, गेल्या तीन दिवसापासून साताऱ्यात मुसळधार व संततधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज सकाळी प्रभाग क्रमांक १५ मधील गीतांजली विद्या मंदिरा शेजारील सार्वजनिक स्वछ्तागृहाची स्वच्छता आरोग्य विभागाचे कर्मचारी करीत असताना स्वछ्तागृहाला वाहनाचा धक्का लागून भिंत कोसळली. या घटनेत नगरपालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांसह आजूबाजूचे कर्मचारी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची माहिती समजतात नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान तात्काळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पडलेली भिंत हटवली असून या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


