येथील विसावा नाका (पिरवाडी), ता. सातारा व येथील खेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील विसावा नाका (पिरवाडी), ता. सातारा व येथील खेड फाटा परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 30 जून ते 1 जुलै दरम्यान विसावा नाका (पिरवाडी) परिसरात असणार्या कस्तुरी डुप्लेक्स याठिकाणी पार्किंग केलेली एमएच 11 सीएक्स 2612 ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार राकेश सुभाष नलवडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दुसर्या घटनेत दि. 2 जुलै ते 3 जुलै रोजी सातारा परिसरात असणार्या खेड फाटा येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये पार्किंग केलेली दुचाकी क्र. एमएच 11 एन 8756 अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार सुर्यकांत रायसिंग महामुलकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


