येथील तहसिल आवारात पहिल्या मजल्यावर असणार्या शासकीय कार्यालयातून अज्ञात चोरट्याने 28 हजार रुपये किंमतीच्या चार बॅटर्या चोरुन नेल्या.
सातारा : येथील तहसिल आवारात पहिल्या मजल्यावर असणार्या शासकीय कार्यालयातून अज्ञात चोरट्याने 28 हजार रुपये किंमतीच्या चार बॅटर्या चोरुन नेल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 2 ते 4 जुलै रोजी सातारा येथील सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व जिल्हा मुद्रांक कार्यालय, हजेरी बंगला तहसिल कार्यालय येथील पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या 28 रुपये किंमतीच्या चार बॅटर्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


