maharashtra

खिंडवाडी येथील मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हे


Crimes against three in assault case at Khindwadi
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच एकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत तेथीलच एकाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकरणी तिघाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 3 जुलै रोजी सातारा औद्योगिक वसाहत ते खिंडवाडी जाणार्‍या मार्गावर सुरज साहेबराव जाधव रा. खिंडवाडी हे दुचाकीवरुन जात असताना समोरुन आलेल्या इनोव्हा कारमधील प्रसाद जाधव उर्फ कान्ह्या (रा. चिंचणेर वंदन), अभिजीत दत्तात्रय सावंत, पप्पु जाधव (दोघेही रा. खोकडवाडी, ता. सातारा) यापैकी एकाने त्यांना शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता त्या तिघांनी सुरज जाधव यांना लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.