maharashtra

दारुच्या नशेत पडून एकाचा मृत्यू


One died of alcoholism
येथील मोळाचा ओढा परिसरात दारुच्या नशेत पडून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

सातारा : येथील मोळाचा ओढा परिसरात दारुच्या नशेत पडून उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 1 जुलै रोजी 7 वा. सुमारास सातारा येथील मोळाचा ओढा रिक्षा स्टॉपजवळ सुरेद्र सिंग (वय 48, रा. मोळाचा ओढा) हे दारुच्या नशेत चालत जात असताना पडून गंभीर जखमी झाले. त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा दि. 4 जुलै रोजी मृत्यू झाल्याची खबर डॉ. सपकाळ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.