जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात इसमांनी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात इसमांनी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील एका गावातून दि. 27 जून रोजी साडेदहा ते साडेतीन वा. दरम्यान राहत्या घरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसर्या घटनेत कराड तालुक्यातील एका गावातून 25 जून रोजी 10 वा. सुमारास एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.