maharashtra

बांधावरुन गेल्याने दमदाटी


Damdati after crossing the dam
बांधावरुन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याने एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरा बाळु कांबळे रा. कोंडवे ता. सातारा असे त्यांचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सातारा : बांधावरुन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याने एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरा बाळु कांबळे रा. कोंडवे ता. सातारा असे त्यांचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरा कांबळे यांच्या शेतातील बांधावरून शहनाझ रफिक शेख वय ५४, रा. कोंडवे ता. सातारा या ये-जा करत होत्या. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. मिरा यांनी शहनाझ यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. यामुळे शहनाझ यांनी तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करत आहेत.