म्हसवड, ता. माण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन 95 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : म्हसवड, ता. माण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन 95 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 ते 27 जून दरम्यान म्हसवड येथील बाळासाहेब दामू खांडेकर यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. लॉकरमध्ये ठेवलेली 24 हजार रु. किंमतीची सोन्याची कानातील फुले, 44 हजार रु. किंमतीचे कानातील झुबे, 16 हजार रु. किंमतीची सोन्याची ठुशी, 1 हजार रुपये किंमतीची नथ आणि 7 हजार रुपये रोख असा एकूण 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला असून पो.नि. विशाल भंडारे तपास करीत आहेत.