चाफळ येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. यावेळी समर्थ सभागृहामध्ये समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज यांच्याकडून गुरु मंत्र देण्यात आला.
वीज वितरण कंपनीने महाराष्ट्रात इंधन अधिभार 20 टक्के वाढवल्याने आम आदमी पार्टीने याचा निषेध म्हणून सातार्यात बुधवारी कंदील आंदोलन केले. तसेच यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.
चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक घेऊन सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला.
सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशी दिवशीच आलेल्या बकरा ईद या पारंपारिक सणाला फाटा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या सौहार्द्रतेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
महाबळेश्वर येथे दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवून एकाचा मृत्यू आणि एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
येथील पोल्ट्री फार्म वरील कामगाराने दुचाकीसह मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली आहे.
येथील एका शाळेसमोरून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.