maharashtra

साताऱ्याच्या आर्या बारटक्केचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सत्कार

निलेश मोरे यांचा पुढाकार

Chief Minister Eknath Shinde felicitates Arya Bartakke of Satara
चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक घेऊन सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला.

सातारा : चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक घेऊन सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला. मुख्यमंत्र्यांना हे समजताच त्यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना बोलवून घेऊन मुंबई येथे त्यांचा सत्कार केला.
आर्याचे एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केले. साताऱ्याच्या मातीची गुणवत्ता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी आर्यावर स्तुतीसुमने उधळली. पाठीवर शाबासकीचा हात ठेवून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यामध्ये भारताला ऑलम्पिक मध्ये देखील सुवर्णपदक मिळवून आपल्या साताऱ्याचा अभिमान जागतिक स्तरावर वाढवण्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या.
सत्कार प्रसंगी साताऱ्यामधील मुख्यमंत्री यांचे खंदे समर्थक निलेश मोरे  तसेच आर्या बारटक्के हिचे मुख्य प्रशिक्षक अमित सागवान, विजय कांबळे, सागर जगताप आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमी अध्यक्ष मंगेश जाधव, उपाध्यक्ष देवेंद्र बारटक्के, सचिव सचिन दीक्षित, खजिनदार सुनील इंगवले आणि रमेश शिंगटे, अभिजीत सपकाळ, संकेत नवघणे उपस्थित होते.