येथील पोल्ट्री फार्म वरील कामगाराने दुचाकीसह मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली आहे.
फलटण : येथील पोल्ट्री फार्म वरील कामगाराने दुचाकीसह मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, झिरपवाडी तालुका फलटण गावच्या हद्दीतील आदित्य ज्योतीराम गुंजवटे यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्म हाऊस वर राहुल यादव राहणार बिहार हा कामगार कामास होता त्याने दिनांक 9 जुलै रोजी संदीप बबनराव आंबोले वय 4% राहणार सस्तेवाडी तालुका फलटण यांची दुचाकी क्रमांक एम एच 11 लस 81 80 आणि त्यांचा मोबाईल चोरून नेला असल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत.


