चाफळ येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. यावेळी समर्थ सभागृहामध्ये समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज यांच्याकडून गुरु मंत्र देण्यात आला.
चाफळ : चाफळ येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. यावेळी समर्थ सभागृहामध्ये समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज यांच्याकडून गुरु मंत्र देण्यात आला.
आजचा दिवस भारतीय परंपरेनुसार समर्थ भक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक एकत्र येऊ शकत नव्हते. या प्रादुर्भावावर मात करून मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमा उत्सव हा साजरा करण्यात आला. श्रीराम रायाची आणि समर्थांची पूजा भूषण महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली.
ज्ञान देताना भूषण स्वामी महाराज म्हणाले, आयुष्यात सद्गुरूंचे स्थान खूप मोठे असते. आपण जेव्हा जीवनात वाटचाल करत असतो तेव्हा मातृदेवो भव, पितृ देवो भव, आणि आचार्य देवो भव या तीन देवतांना जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. आजचा दिवस हा गुरूंच्या प्रती समर्पण आणि जागृत व्हावं या दृष्टीने आजचा दिवस खूप मोलाचा आहे. जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते. येणारे अडचणींना कसे सामोरे जावे आणि मार्ग काढून देण्याचे काम या संत पुरुष या सद्गुरु मार्फत होत असते. सद्गुरूंच्या विचारांचा वारसा, विचारांचे धन पुढे नेण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत, असे आवाहन भूषण महाराज यांनी केले. समाजासाठी जे काही चांगलं करू शकतो आपल्या जीवनातील उत्तम ज्ञानाचा ठेवा इतरांना देऊन त्यांची संकटे दूर करू शकतो. तसेच समाजावरील अनिष्ट दूर व्हावे हीच सद्गुरु चरणी प्रार्थना.
या उत्सवात चाफळ नगरीसह आजूबाजूच्या भागातून बहुसंख्य भाविक दाखल झाले होते.


