maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime against one person for causing death
वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवून एकाचा मृत्यू आणि एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

कराड : वेगाने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवून एकाचा मृत्यू आणि एकास जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-बंगलोर महामार्गावरील वराडे गावच्या हद्दीत दिनांक आठ रोजी पावणे आठ वाजताच्या दरम्यान मारुती कार क्रमांक एमएच १२ टीडी 8744 वरील चालक विजय बाळकृष्ण हळीजोळे मूळ राहणार बेळगाव- कर्नाटक, हल्ली राहणार वाघोली पुणे याने निष्काळजीपणे, वेगात गाडी चालवून त्याच्या पुढे चाललेली मोटरसायकल क्रमांक एमएच 50 इ 5975 या दुचाकीस धडक देऊन अपघात केला. या अपघातात मोटर सायकलस्वार मनोज मारुती डफळे वय ४५ राहणार मसूर यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी सौ वैशाली मारुती डफळे वय 35 राहणार वडवली भिकेश्वर, तालुका कराड या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि अपघात केल्याप्रकरणी कारचालक हळीजोळे याच्यावर तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार मुळीक करीत आहेत.