दि. 12 रोजी यवतेश्वर घाटातील एका वळणावर एक मारुती आल्टो कार तब्बल 700 फूट दरीत कोसळली. या कारमध्ये सातजण असल्याची माहिती आहे. यांमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बहुतांश धरणे ओव्हर फ्लो झाल्यामुळे आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलले. त्यामुळे नदीपात्रात प्रति सेकंद १० हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
मोळाचा ओढा ते महानुभाव मठ यादरम्यान अतिक्रमण करणाऱ्या दुकानांपैकी सात दुकाने सातारा पालिकेच्या शहर विकास विभागाने शुक्रवारी सील केले. संबंधित व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला.
जयकुमार गोरे यांनी गत महिन्यात अटकपूर्व जामिनासाठी सवोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आधी कोर्टापुढे शरण या मगच जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार आमदार जयकुमार गोरे प्रक्रिया करुन सातारा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्या मायणी प्रकरणात गोरे यांना जामीन मंजूर झाला आहे.
गेल्या अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी पर्यटन क्षेत्रात काय केले, हे त्यांनी सांगावे. पुढील अडीच वर्षात आम्ही त्यांच्या दुप्पट पर्यटनाच्या क्षेत्रातील कामे करून दाखवू. त्यांची विधाने आम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारली आहेत, असा सडेतोड इशारा शिंदे गटाचे माजी प्रवक्ते आणि कॅबिनेट पदाची शपथ घेतलेले दिपक केसरकर यांनी साताऱ्यात दिला.
अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ट्रान्सफॉर्मर मधील 50,000 रुपयांच्या तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.