maharashtra

पन्नास हजारांच्या तांब्याच्या तारेची चोरी


ट्रान्सफॉर्मर मधील 50,000 रुपयांच्या तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील 50,000 रुपयांच्या तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक ९ ऑगस्ट रोजी दुपारी सहा ते दिनांक दहा ऑगस्ट च्या सात वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने नांदवळ, तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत असणारा 22 केव्ही चा ट्रान्सफॉर्मर तोडून, खाली पाडून, त्याचे नुकसान करून त्यामधील सुमारे 70 किलो वजनाची 50 हजार रुपये किमतीची तांब्याची तार व ऑइल चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद सुनील सुरेश पवार वय 30, राहणार नांदवळ, तालुका जिल्हा सातारा यांनी वाठार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस नाईक चतुरे करीत आहेत.