maharashtra

यवतेश्‍वर घाटात तब्बल 700 फूट दरीत कोसळली आल्टो कार

गाडीत सातजण असल्याची माहिती; दोघांची प्रकृती गंभीर

दि. 12 रोजी यवतेश्‍वर घाटातील एका वळणावर एक मारुती आल्टो कार तब्बल 700 फूट दरीत कोसळली. या कारमध्ये सातजण असल्याची माहिती आहे. यांमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

सातारा : दि. 12 रोजी यवतेश्‍वर घाटातील एका वळणावर एक मारुती आल्टो कार तब्बल 700 फूट दरीत कोसळली. या कारमध्ये सातजण असल्याची माहिती आहे. यांमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा-बामणोली रस्त्यावर असणार्‍या यवतेश्‍वर घाटातील पॉवर हाऊसपासून थोड्या अंतरावर असणार्‍या एका वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने मारुती आल्टो गाडी सुमारे 700 फूट दरीत कोसळली. या घटनेबाबत समजताच तेथील स्थानिक रहिवाशांनी शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचताच त्यांनी बचावकार्य हाती घेतले. त्यांनी दोरांच्या सहाय्याने या गाडीतील सर्व जखमींना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. बचावकार्य उत्कृष्टपणे पार पडल्याबद्दल उपस्थितांनी शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे आभार मानले आहेत.