Satara

esahas.com

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सातारा जिल्ह्यात आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या  दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.

esahas.com

बस स्टँड परिसरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

येथील बस स्टँड परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

राहत्या घरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

येथील शाहूनगरमधील राहत्या घरातून अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली.

esahas.com

दोन दुचाकींसह ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरी करणारी दुक्कल अटकेत

दोन दुचाकींसह ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. प्रल्हाद शिवाजी पवार वय २३, रा. अजंठा चौक, गोपाळवस्ती, सातारा ‌आणि शिवाजी मल्हारी बुट्टे, वय ३८, रा. अजंठा चौक, सातारा अशी त्यांची नावे आहेत.

esahas.com

आ. महेश शिंदे यांच्या कार्यक्रमात आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष

दोनच दिवसापूर्वी कोरेगाव, ता. कोरेगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नावाचा जयघोष केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रति असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अनोख्या निष्ठेची साताऱ्यासह राज्यात एकच चर्चा रंगली आहे.

esahas.com

पोस्ट कर्मचाऱ्यांची साताऱ्यात निदर्शने

आपल्या विविध मागण्यांसाठी पोस्ट कर्मचाऱ्यांनी आज येथील पोवई नाक्यावर असणाऱ्या मुख्य पोस्ट कार्यालयासमोर निदर्शने केली.

esahas.com

साताऱ्यात 2 ऑक्टोबर रोजी मास मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) यांच्यावतीने २ ऑक्टोंबर रोजी ‘मास मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ११ किलोमीटर व पाच किलोमीटर या दोन गटात सकाळी सहा वाजता सुरु होणार असून, स्पर्धेचे आयोजन औद्योगिक परिसरात करण्यात आल्याची माहिती मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

साताऱ्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सातारा येथील सनराईज स्पोर्ट क्लब आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दि. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल उपस्थित राहणार आहेत.

esahas.com

नारळी पौर्णिमा , रक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती

सण, उत्सव व व्रते यांच्यामागचे शास्त्र लक्षात घेऊन श्रद्धापूर्वक साजरे करण्यात आपलेच कल्याण असते. वास्तविक आपल्या जीवनात नेहमीच संयम पाहिजे, पण तो पाळला जात नाही; म्हणून निदान सण, धार्मिक उत्सव व व्रतांच्या दिवशी तरी तो पाळला जावा, म्हणजे हळूहळू नेहमीच संयमित जीवन जगता येईल. कर्मकांडाच्या दृष्टीने सण, धार्मिक उत्सव व व्रते इतकी महत्त्वाची आहेत की, वर्षातील जवळजवळ ७५ टक्के तिथींना यांपैकी काही ना काही असतेच. यात श्रावण महिन्याला सण, धार्मिक उत्सव व व्रतांचा महिनाच म्हटले जाते. या महिन्यात येणार्‍या सण, धार्मिक उत्सव व व्रतांमध्ये नारळी पौर्णिमा हा एक सण साजरा केला जातो.

esahas.com

ट्रकमधुन ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस

येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या पर्ल हॉटेलच्या पाठीमागे लावलेल्या ट्रकमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.