दोन दुचाकींसह ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. प्रल्हाद शिवाजी पवार वय २३, रा. अजंठा चौक, गोपाळवस्ती, सातारा आणि शिवाजी मल्हारी बुट्टे, वय ३८, रा. अजंठा चौक, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
सातारा : दोन दुचाकींसह ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. प्रल्हाद शिवाजी पवार वय २३, रा. अजंठा चौक, गोपाळवस्ती, सातारा आणि शिवाजी मल्हारी बुट्टे, वय ३८, रा. अजंठा चौक, सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रात्रग्रस्त घालत असताना अजंठा चौक परिसरामध्ये दुचाकी चोरीमधील सराईत युवक हा दुचाकीवरून संशयितरित्या फिरत असताना आढळून आला. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. मात्र नंतर त्याने संबंधित दुचाकी वाढे, ता. सातारा येथून चोरी केली असल्याचे सांगितले. संबंधित युवक दुचाकी चोरीतील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सातारा येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार मॉल जवळून आणखीन एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने ट्रकच्या दोन बॅटरीची चोरी केल्याचे सांगितले. या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.


