dukkalarrestedforstealingtwobatteries

esahas.com

दोन दुचाकींसह ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरी करणारी दुक्कल अटकेत

दोन दुचाकींसह ट्रकच्या दोन बॅटऱ्या चोरी केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. प्रल्हाद शिवाजी पवार वय २३, रा. अजंठा चौक, गोपाळवस्ती, सातारा ‌आणि शिवाजी मल्हारी बुट्टे, वय ३८, रा. अजंठा चौक, सातारा अशी त्यांची नावे आहेत.