maharashtra

सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा


सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 10 जुलै रोजी सैदापूर गावच्या हद्दीत विद्यानगर कॉलेज ते कराड जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षा चालक कमुद्दिन मज्जित सय्यद वय 55 राहणार सैदापूर, तालुका कराड याने त्याच्या ताब्यातील रिक्षा क्रमांक एमएच 50 एम 1361 ही अविचाराने, बेदरकारपणे, निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच आपल्या शेजारी प्रवासी बसून व इतरांच्या जीवितास धोका होईल अशी चालवली. याप्रकरणी संतोष रामचंद्र पवार वय 55 यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस. एम. सावंत करीत आहेत.