maharashtra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी सातारा जिल्ह्यात आगमन

जेसीबी मधून पुष्पवृष्टी; जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या  दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या  दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी महाबळेश्वर येथे आगमन झाले. यावेळी मुसळधार पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबळेश्वरकरांनी जल्लोषात स्वागत केले. फटाक्यांची आतषबाजी व एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी छ शिवाजी महाराज चौक परीसर दूमदुमला होता. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी त्यांचे शहरात पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. शहरवासियांच्या वतीने तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांनी, तर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
शिवसेनेतील 40 आमदारांचा गट घेवुन एकनाथ शिंदे यांनी वेगळी चुल मांडुन भाजपा बरोबर संसार थाटला. भाजपा बरोबर युती करून त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आपल्या हाती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र असुन मुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्या नंतर ते प्रथमच महाबळेश्वर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ना. शंभुराज देसाई हे देखिल त्यांच्या सोबत होते. आपल्या दरे गावी जाण्यापुर्वी छ शिवाजी महाराज चौकात त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. सायंकाळी त्यांचे येथे आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या समर्थकांनी घोषणांनी चौक दणाणुन सोडला होता. सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परीषदेचे कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल हे देखिल यावेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, पंचायत समितीचे माजी सभपती संजय गायकवाड, माजी नगरसेविका विमल ओंबळे, विजय नायडु, सुभाष कारंडे आदी मान्यवरांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. महाबळेश्वर तालुका वारकरी संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत बावळेकर, दत्तात्रय भिलारे यांनी देखिल त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या स्वागता साठी नागरीकांनी भर पावसात छ. शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती.
मुख्यमंत्री यांनी येथील भवानीमातेचे दर्शन घेवुन याठिकाणी असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयाला हार घालुन अभिवादन केले. यानंतर त्यांनी लोकांच्या स्वागताचा स्विकार केला व नागरीकांना अभिवादन करून ते तापोळयाकडे रवाना झाले. तत्पुर्वी ना शंभुराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चरणस्पर्श करून आशिर्वाद घेतला व ते साताराकडे रवाना झाले.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावांच्या संघटनेने त्यांना आपला पाठींबा जाहीर केला होता. आज याच 105 गावातील एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी तापोळा येथे भुमिपुत्राच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. आज तापोळा येथे त्यांनी ग्रामस्थांच्या स्वागताचा स्विकार केला. त्यांच्याशी संवाद साधुन ते आपल्या दरे गावाकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली असली तरी अनेक कट्ट्रर शिवसैनिकांनी मुख्यमंत्री यांच्या या दौऱ्याकडे दुर्लक्ष केले होते. काही मोजकेच शिवसैनिक यावेळी छ. शिवाजी महाराज चौकात जमा झाले होते. याबाबतही उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.