maharashtra

दुचाकीची चोरी


अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अभिजीत दीपक जिरगे राहणार गजगौरी रेसिडेन्सी बिल्डिंग, रेल्वे स्टेशन जवळ, ओगलेवाडी, तालुका कराड यांची काळ्या रंगाची होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 50 के 2732 ही अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बामणे करीत आहेत.