एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 10 जुलै रोजी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास शहर परिसरात राहत असणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिक महिला आपल्या क्लिनिक मध्ये जात असताना नितीन बबन साळुंखे (रा. कर्मवीर नगर, सातारा) याने संबंधित महिलेच्या घरापासून पाठलाग करून महिलेने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल केलेले गुन्हे परत न घेतल्यास क्लिनिक फोडण्याची, काम करून न देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर संबंधित पीडित डाॅक्टर महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी नितीन साळुंखेवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक इंगवले करीत आहेत.


