गुरूकुल प्रायमरी स्कूल शाहुनगर सातारा येथे आमच्या पाल्याचे आर.टी.ई या योजनेअंतर्गत दर्जेदार शिक्षण घेत असून याबाबत आम्ही पुर्ण समाधानी आहोत आमच्या पाल्याचे आर.टी.ई अंतर्गत शिक्षणाच्या बाबत शासनाने पालकत्व स्विकारले आहे.
सातारा शहरात लाडक्या बाप्पांच्या स्वागताची जोरदार तयारी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी रिमझिम पावसात मांडव उभारणीचे काम सुरू असून बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच वर्दळ वाढली. गणपती मूर्ती व गौरीच्या स्टॉल्सवर गर्दी होऊ लागली आहे.
सातारा जिल्ह्यातील जिल्हा शिवसेनेची शिवसेना आणि शिंदे प्रणित शिवसेना अशी दोन शकले झाली आहेत. या दोन्ही गटांच्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाल्या असून दोन्ही गटांचा समांतर शक्तिप्रदर्शनाचा प्रवास सुरू झाला आहे. आगामी जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही गट एकमेकांना शह-काटशह देणार हे आता निश्चित झाले आहे.
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा तालुका अ वर्ग या संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार सुरेश पार्टे, तर सचिवपदी धनंजय पवार यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
कुडाळ, ता. जावळी गावात वर्षानुवर्ष स्मशानभूमीच नसल्याने या गावकऱ्यांनी चक्क पावसात अंत्ययात्रेनंतर मृतदेह दफन केला असल्याची खळबळ जनक घटना नुकतीच समोर आली आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत महामार्गावर एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रविवारी रात्री तालीम संघावर झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात डॉल्बी वाजल्यानंतर शहर पोलिसांनी त्याचे डेसिबल घेतले असून सोमवारी त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. आता हा प्रस्ताव पोलिस उपविभागीय कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे प्रस्ताव नेमका काय आहे? पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.
तालीम संघाच्या मैदानावर रविवारी झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात कोयते हवेत नाचवून दहशत माजवणार्यांची धरपकड करण्यात आली आहे. यातील काहीजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.
जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्या तीन संशयितांना लोणंद पोलीसांनी केले अटक केली असून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे.