maharashtra

जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍यांना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद


जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍या तीन संशयितांना लोणंद पोलीसांनी केले अटक केली असून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे.

सातारा : जबरी चोरी, घरफोडया व वाहन चोरी करणार्‍या तीन संशयितांना लोणंद पोलीसांनी केले अटक केली असून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी, लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी, घरफोडी व दुचाकी वाहन चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक विशाल वायकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक व त्यांच्या सहकार्‍यांनी या गुन्ह्यांबाबत गोपणीय खबर्‍यांमार्फत माहीती मिळवुन तसेच मिळालेल्या माहीतीच्या व तांत्रीक विष्लेषनाच्या आधारे यातील संशयित आरोपी निष्पन्न केले. परंतु संशयित आरोपी गुंगारा देत असल्याने सापडत नव्हते. दिनांक १८ रोजी संशियत आरोपी हे भोरकरवाडी, तरडगाव ता. फलटण परीसरात येणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोरकरवाडी व तरडगाव ता. फलटण येथे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर व त्याच्या सहकार्‍यांनी कोंबींग ऑपरेशन राबवुन सुनिल केशव भोसले (वय ४०, रा. कारखेल, ता. बारामती), अंकुल रमेश भोसले (वय २०, रा. भुरकरवाडी ता. फलटण), महावीर रमेश भोसले (वय २०, रा. भुरकरवाडी ता. फलटण) आणि एका विधीसंघर्ष बालकास चोरी केलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांच्याकडे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत अधिक विचारपुस करुन त्यांच्याकडुन चोरी केलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे .
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलीस अधीकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोउनि गणेश माने, स्वाती पवार, सफौ सपकाळ, पो. हवा. नलवडे, संतोष नाळे, योगेश कुंभार, महिला पो. हवा. धायगुडे, पो.ना. सर्जेराव सुळ, श्रीनाथ कदम, फैय्याज शेख, पोकाँ विठठल काळे, अभिजीत घनवट, अविनाश शिंदे, अवधुत धुमाळ, केतन लाळगे, प्रिया धुरगुडे, मेघा ननावरे, मनिषा शिंदे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.