तालीम संघाच्या मैदानावर रविवारी झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात कोयते हवेत नाचवून दहशत माजवणार्यांची धरपकड करण्यात आली आहे. यातील काहीजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.
सातारा : तालीम संघाच्या मैदानावर रविवारी झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात कोयते हवेत नाचवून दहशत माजवणार्यांची धरपकड करण्यात आली आहे. यातील काहीजण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालीम संघाच्या मैदानावर रविवारी दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काही युवकांनी कोयता उंचावून दहशत केली. ही बाब समोर येताच गोंधळ उडाला. पोलिसांनी युवकांना ताब्यात घेवून चौकशी केली. यामध्ये आणखी काही जणांना सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी धरपकड मोहिम राबवण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून कोयते जप्त केले आहेत.


