सातारा शहरालगत पिकअपमधून पुण्याकडे तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा गुटखा घेवून निघालेल्या पिकअप चालकावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) कारवाई केली. सर्व मुद्देमाल जप्त करत पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संबंधित कर्नाटक राज्यातून आणला असल्याचे समोर येत असून वाहन पकडताना मध्यरात्री थरार निर्माण झाला.
सातारा नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळ शाळा क्रमांक एकूण 18 पैकी पंधरा शाळांमध्ये नियुक्त शिक्षक, शिक्षण सहाय्यक व मदतनीस यांचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची मागणी संयुक्त शिक्षण बचाव समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.
कास पठारावरील अतिक्रमणांना नोटीस बजाविणार्या सातार्याच्या तहसीलदार आशा होळकर यांची बदली झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा येथे त्यांची बदली करण्यात आली आहे. होळकर यांच्या जागी जिल्हा पुरवठा शाखेचे सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश जाधव यांना सातार्याचे तहसीलदार म्हणून पदभार देण्यात आला आहे.
खासदार उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने तालीम संघ मैदानावर आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये उदयनराजेंचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रचंड गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री होताच ‘नाद नाही करायचा राजेंचा’ म्हणत तरुणाईने एकच जल्लोष करायला सुरुवात केली. लेझर लाइटिंग ची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशा अभूतपूर्व वातावरणात उदयनराजे सुद्धा भावूक झाले. ‘तुम्हीच माझी कॉलर, तुम्हीच माझी फॅमिली’ या उदयनराजेंच्या डायलॉगला तरुणाईने मनापासून दाद दिली.
डॉल्बी लावावी असा एक गट मागणी करत असताना डॉल्बी लावू नये असे सूचवताच बैठकीतच तणातणी होवून गोंधळ उडाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा असून ती जोपासली जावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन बुधवार दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
गाडीच्या डीकीतून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये विषारी औषध प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.
बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्या एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल ब एक जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे.