खासदार उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने तालीम संघ मैदानावर आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये उदयनराजेंचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रचंड गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री होताच ‘नाद नाही करायचा राजेंचा’ म्हणत तरुणाईने एकच जल्लोष करायला सुरुवात केली. लेझर लाइटिंग ची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशा अभूतपूर्व वातावरणात उदयनराजे सुद्धा भावूक झाले. ‘तुम्हीच माझी कॉलर, तुम्हीच माझी फॅमिली’ या उदयनराजेंच्या डायलॉगला तरुणाईने मनापासून दाद दिली.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले मित्र मंडळाच्या वतीने तालीम संघ मैदानावर आयोजित दहीहंडी स्पर्धेमध्ये उदयनराजेंचा करिष्मा पाहायला मिळाला. प्रचंड गर्दीत उदयनराजेंची एन्ट्री होताच ‘नाद नाही करायचा राजेंचा’ म्हणत तरुणाईने एकच जल्लोष करायला सुरुवात केली. लेझर लाइटिंग ची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी अशा अभूतपूर्व वातावरणात उदयनराजे सुद्धा भावूक झाले. ‘तुम्हीच माझी कॉलर, तुम्हीच माझी फॅमिली’ या उदयनराजेंच्या डायलॉगला तरुणाईने मनापासून दाद दिली.
तालीम संघ मैदानावर रविवारी रात्री खासदार उदयनराजे मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाचे एक लाख 77 हजार 777 रुपयांचे बक्षीस जावळी तालुक्यातील गोविंदा पथकाने जिंकले. या स्पर्धेमध्ये भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती. दुपारनंतर तालीम संघाच्या मैदानावर दहीहंडीची जोरदार तयारी सुरू होती. सायंकाळ नंतर युवकांचे जथ्थेच्या जथ्थे तालीम संघ मैदानावर हजर झाले. बघता बघता संपूर्ण मैदान युवा कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी झाली. मैदानावर लेझर शोमुळे सुद्धा रंगत आली होती. अत्यंत जोशपूर्ण वातावरणात रात्री पावणेदहा वाजता उदयनराजे यांची एन्ट्री होताच तरुणांनी एकच जल्लोष केला.
खचाखच गर्दीत उदयनराजे यांनी स्टेजवर येताच कॉलर उडवण्याचे स्टाईलमध्ये ‘तुम्हीच माझी फॅमिली’ असे म्हणत उपस्थितांची मने जिंकली. गर्दीकडे पाहत उदयनराजे म्हणाले, ‘ही तर आपलीच गँग आहे. आत्या, मावशी, काका-काकू सगळी नाती जन्मताच रेडीमेड मिळतात. पण तुमच्यासारख्यांचं प्रेम मी शब्दात वर्णन करू शकत नाही. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात, या भावनिक उद्गाराला सातारकर युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. उदयनराजेंच्या जयजयकाराने पुन्हा एकदा आसमंत दणाणून गेले. त्यानंतर राजेंच्या उपस्थितीत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरू केली. रात्री उशिरापर्यंत गोविंदा पथकांचा थरार सुरू होता या पथकांवर पाण्याचा फवारा तसेच विद्युत रोषण्याचे झोत टाकले जात होते. रात्री उशिरा गोविंदा पथकांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले.


