maharashtra

गाडीच्या डीकीतून सुमारे एक लाख तीस हजारांची चोरी


गाडीच्या डीकीतून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : गाडीच्या डीकीतून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 ऑगस्ट रोजी सचिन लक्ष्मण जाधव वय 42 राहणार खानापूर, तालुका वाई यांनी त्यांच्या शेतीच्या कामासाठी वाई अर्बन बँकेतून एक लाख तीस हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी आपल्या एक्टिवा गाडीच्या (क्र. एम एच 11 बीआर 3678) डिकीत ठेवली. त्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ते वाठार फाटा येथे आले असता त्यांना त्यांच्या गाडीच्या डिकी मधून 1 लाख 30 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले असल्याचे उमगले. यानंतर त्यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस नाईक वायदंडे अधिक तपास करीत आहेत.