maharashtra

अवैध गुटखा प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषनची थरारक कामगिरी

तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सातारा शहरालगत पिकअपमधून पुण्याकडे तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा गुटखा घेवून निघालेल्या पिकअप चालकावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) कारवाई केली. सर्व मुद्देमाल जप्त करत पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संबंधित कर्नाटक राज्यातून आणला असल्याचे समोर येत असून वाहन पकडताना मध्यरात्री थरार निर्माण झाला.

सातारा : सातारा शहरालगत पिकअपमधून पुण्याकडे तब्बल 20 लाख रुपये किंमतीचा गुटखा घेवून निघालेल्या पिकअप चालकावर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) कारवाई केली. सर्व मुद्देमाल जप्त करत पिकअप वाहन ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संबंधित कर्नाटक राज्यातून आणला असल्याचे समोर येत असून वाहन पकडताना मध्यरात्री थरार निर्माण झाला.
प्रशांत देवराव आयकर (वय 21, रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुटख्याची वाहतुक होत असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. यासाठी पोलिसांनी सापळा लावला. संशयास्पद वाहन आल्यानंतर पोलिसांनी पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाने ते वाहन न थांबवता तसेच दामटले. यामुळे पोलिसांनी थरारक पाठलाग केला. अखेर खावली परिसरात पिकअप वाहन थांबवण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी पिकअपमध्ये पाहणी केली असता त्यामध्ये पोती होती. चालकाला त्याबाबत विचारणा केली असता तो उत्तर देईना. पोत्यांची पाहणी केली असता त्यात गुटखा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेवून गुटख्याचे वाहन जप्त केले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पिकअपमध्ये तब्यबल 19 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा व वाहन असा 24 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, फौजदार मदन फाळके, फौजदार अमित पाटील, पोलिस दिपक मोरे, उत्तमराव दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत,  अमित सपकाळ, मोनाली निकम, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, प्रवीण कांबळे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, शिवाजी गुरव यांनी कारवाईत सहभाग घेतला.