maharashtra

जिल्ह्यात दोन दुचाकींची चोरी


जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 ऑगस्ट रोजी शाहूनगर मधील शिवम हॉस्पिटल शेजारील एसबीआयच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी सुरेश उत्तम शेलार वय 52, राहणार गोडोली, सातारा हे गेले होते. त्यावेळेस त्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेली मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीबी 33%2 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत फुले नगर, वाई येथून दिनांक 13 ऑगस्ट रोजी च्या रात्री ते 14 ऑगस्ट च्या सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान महेश सदाशिव जमदाडे वय 45 यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक 11 एव्ही 0950 ही राहत्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महिला पोलीस हवालदार माने अधिक तपास करीत आहेत.