बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्याच्या मुसक्या आवळल्या
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; दोन गावठी पिस्टल व एक जिवंत राउंड जप्त
बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्या एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल ब एक जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे.
सातारा : बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्या एकाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल ब एक जिवंत राउंड जप्त करण्यात आला आहे.
अल्तमश हरुन तांबोळी (रा. मंगळवार पेठ, कराड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी सातारा जिल्हयामध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणार्यांची माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानेकिशोर धुमाळ यांनी सपोनि रमेश गर्जे व पोउनि अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्यांवर कारवाई करण्याकरीता एक विशेष पथक तयार केलेले आहे.
दि. 20 ऑगष्ट 2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एकजण माजगांव फाटा, ता.जि.सातारा येथे गावठी पिस्टल विक्री करीत घेवून येणार असून त्याच्याजवळ दोन गावठी पिस्टल आहेत. अशी बातमी मिळाल्याने त्याठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यासाठी किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास आदेश दिले. त्याप्रमाणे पधकातील अधिकारी व अंमलदार यांनी माजगांव फाटा ता.जि.सातारा येथे सापळा लावला. सायंकाळी 8.30 वा. मिळालेल्या बातमीतील वर्णनाच्या इसमास पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात दोन देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतुस (राउंड) व एक मोपेड गाडी असा एकुण 9 लाख 80 हजार 200 रुपयांचा माल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे. याबाबत बोरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तमराव दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, अतिश घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाने, प्रविण पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीण, संकेत निकम गणेश कचरे यांनी सहभाग घेतला असून तपासात सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.


