maharashtra

दोन घटनांमध्ये विषारी औषध प्राशन केलेल्या दोघांचा मृत्यू


जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये विषारी औषध प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

सातारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये विषारी औषध प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 ऑगस्ट रोजी साडेसात ते 20 ऑगस्ट रोजी च्या नऊ वाजल्याच्या दरम्यान आसरे, तालुका वाई येथील जगन्नाथ कृष्णा सणस वय 84, राहणार आसरे, (आनंद नगर) सध्या राहणार हरिहरेश्वर कॉम्प्लेक्स, वाई यांनी मानसिक तणावातून गवतावर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर राजेंद्र जगन्नाथ सणस वय 51 यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत राहुल प्रभाकर कदम वय 26 राहणार कवठे, तालुका वाई याने दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची खबर डॉक्टर पी. बी. भोसले यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे.