maharashtra

तालीम संघावरील दहिहंडीमध्ये वाजलेल्या डॉल्बीचे पोलिसांनी घेतले डेसिबल


रविवारी रात्री तालीम संघावर झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात डॉल्बी वाजल्यानंतर शहर पोलिसांनी त्याचे डेसिबल घेतले असून सोमवारी त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. आता हा प्रस्ताव पोलिस उपविभागीय कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे प्रस्ताव नेमका काय आहे? पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.

सातारा : रविवारी रात्री तालीम संघावर झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात डॉल्बी वाजल्यानंतर शहर पोलिसांनी त्याचे डेसिबल घेतले असून सोमवारी त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. आता हा प्रस्ताव पोलिस उपविभागीय कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे प्रस्ताव नेमका काय आहे? पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री दहिहंडी निमित्त तालीम संघावर डॉल्बी लावण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. डॉल्बीच्या ठेक्यावर उपस्थितांनी ताल धरला. यावेळी काही युवकांनी कोयता नाचवल्याने गोंधळाचे वातावरण झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान, डॉल्बी वरुन गेल्या काही दिवसांपासून सातार्‍यात पोलिस विरुध्द लोकप्रतिनिधी असा सामना रंगला आहे. पोलिस डॉल्बीच्या विरोधात, तर प्रतिनिधी डॉल्बीच्या बाजूने आहेत. रविवारी दहिहंडी कार्यक्रमात डॉल्बी वाजल्यानंतर पोलिसांनी नियमांप्रमाणे डेसिबल तीव्रता मोजली. कार्यक्रम झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचे दोन पंचनामे केले. सोमवारी संबंधित डॉल्बी डेसिबलचा प्रस्ताव सातारा शहर पोलिसांनी तयार केला. आता हा प्रस्ताव सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या कार्यालयाकडे जाणार असून त्या अवलोकन करुन पुढील कार्यवाही करणार आहेत. यामुळे नेमका प्रस्ताव काय आहे? हे येत्या काही दिवसात समजेल.