पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.
सातारा : पडळ, ता.खटाव येथील कारखान्यातील कामगाराच्या खून प्रकरणात दीड वर्षापासून कारागृहात असलेले मनोज घोरपडे यांना उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला.
11 मार्च 2021 रोजी मनोज घोरपडे यांच्यासह 13 जणांवर कामगाराच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांमध्ये मनोज घोरडपे यांच्यासह त्यांचे सख्ख्ये बंधू तसेच माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचाही समावेश होता. खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वडूज पोलिसांनी 11 जणांना अटक केली. सुरुवातीला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर संशयितांची रवानगी कारागृहात करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपूर्वी यातील बहुतेकांना जामीन मिळाला आहे. मात्र मनोज घोरपडे यांना जामीन मिळाला नव्हता. नुकताच त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर युक्तिवाद झाल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना अटी, शर्थींवर जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, खून प्रकरणात अद्याप दोन संशयितांना अटक झालेली नसून पोलिस त्यांचा तपास करत आहेत.


