maharashtra

म.गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा च्या अध्यक्षपदी सुरेश पार्टे, तर सचिवपदी धनंजय पवार यांची फेरनिवड


महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा तालुका अ वर्ग या संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार सुरेश पार्टे, तर सचिवपदी धनंजय पवार यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

मेढा : महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा तालुका अ वर्ग या संस्थेच्या अध्यक्षपदी पत्रकार सुरेश पार्टे, तर सचिवपदी धनंजय पवार यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा या संस्थेची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट २२ रोजी वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार सुरेश पाटॅ यांच्या अध्यक्षतेखाली स्व. विजया थत्ते सभागृहात संपन्न झाली. यावेळी मेढ्याचे माजी सरपंच नारायणराव शिंगटे, जवळवाडीचे माजी उपसरपंच रघुनाथ जवळ व संचालकांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रारंभी मेढा व जावळी तालुक्यासह देशासाठी प्राणाची बाजी लावणारे सैनिक, राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, सहकार, वैद्यकिय, साहित्यीक, वृत्तपत्र क्षेत्रातील दिवंगत  झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवर सभासदांचे स्वागत ग्रंथपाल सौ. आशा मगरे यांनी केले. सुरेश पाटॅ यांनी प्रास्ताविक केले. मागील सभेचे प्रोसिडींग, वार्षिक ताळेबंद, वार्षिक अहवाल, अंदाजपत्रक एकमताने मंजुर करण्यात आले.
या सभेमध्ये सन  २०२२ ते सन २०२५ अखेर सर्वानुमते पुढील संचालक मंडळाची निवड करण्यात आली -
अध्यक्ष - सुरेश पार्टे, सचिव - धनंजय पवार, कार्याध्यक्ष - नारायणराव शिंगटे, सहसचिव - प्रकाश परांजपे, अंतर्गत हिशोब तपासणीस - विठ्ठल देशपांडे, रघुनाथ जवळ तर, संचालकपदी - गणेश खताळ, अशोक दिक्षित, शशिकांत कदम, सौ. शोभा शेडगे, नंदा काशिलकर, शैला सपकाळ, सौ. स्वाती दिक्षित, सौ रुपाली वारागडे, सचिव धनंजय पवार यांनी सर्व उपस्थित सभासद व नवीन पदाधिकारी व संचालक, संचालिका यांचे अभिनंदन करुन आभार मानले.
यावेळी शिवाजीराव देशमुख, संतोष वारागडे, सहायक ग्रंथपाल इमताज शेख, लिपीक सौ. माधवी कदम, दिक्षा चव्हाण उपस्थित होते.