अज्ञात वाहनाच्या धडकेत महामार्गावर एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत महामार्गावर एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर शेंद्रे गावच्या हद्दीत अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या बाजूस असलेल्या पुलावर एका ७० वर्षीय वृद्धास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची खबर उमेश यशवंत यादव वय 48, राहणार शेंद्रे, तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


