Satara

esahas.com

छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील

साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, अशी भाकणूक आदमापुर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली, उदयनराजे भोसले यांनीही विसापूर बोबडेवाडी भागाला निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.

esahas.com

ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेचा उदयनराजेंना पाठिंबा

ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदनही दिले. याबाबत नजीकच्या  अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन उदयनराजे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

esahas.com

महाभकास आघाडीला घरी बसवा

काँग्रेसच्या काळात लोकांना दोन वेळेचं अन्नही मिळत नव्हतं. अनेकांना डोक्यावर छप्परही नव्हतं. अशा काँग्रेसी मनोवृत्तीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी तयार करून निवडणूक लढवणे सुरू केले आहे, अशा महाभकास आघाडीला घरी बसवा, असे आवाहन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.

esahas.com

शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?

निवडून येणारे शोभेचे हत्ती अनेक असतात, पण जनतेला त्यांचा उपयोग काय? असा सवाल महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.

esahas.com

बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या सरदारांच्या वंशजांतर्फे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

esahas.com

शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे महायुतीच्या शिष्टाचाराच्या पाठीशी राहायचे की भ्रष्टाचारी लोकांना मदत करायची, हे जनतेनेच ठरवावे, असे प्रतिपादन महायुतीचे लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केले.

esahas.com

रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश

कोणत्याही जाती धर्माला थारा न देणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पक्षामध्ये येत्या 4 मे रोजी आपण प्रवेश करीत आहोत. पक्ष माझ्यावर जी जबाबदारी दिली ती स्वीकारून ती जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी माहिती स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे विराट सभा पार पडली. या सभेस जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आदेशाने हजारो मनसैनिक रॅलीने उपस्थित राहिल्याने मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला झाला.

esahas.com

पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथील सभा यशस्वी झाल्याची जोरात चर्चा आहे. तळपत्या उन्हात हजारो भाजप कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांना ऐकण्यासाठी तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.

esahas.com

राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. येथील श्री बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला.