maharashtra

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला

मनसे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांची हजारो मनसैनिकांच्या रॅलीने सभेस उपस्थिती

सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे विराट सभा पार पडली. या सभेस जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आदेशाने हजारो मनसैनिक रॅलीने उपस्थित राहिल्याने मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला झाला.

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथे विराट सभा पार पडली. या सभेस जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आदेशाने हजारो मनसैनिक रॅलीने उपस्थित राहिल्याने मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर महायुतीला प्रचंड मोठी ताकद मिळाली आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचेही राजसाहेब ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.
त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना जाहीर पाठींबा जाहीर करीत उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे महायुतीमधील भाजप चे अधिकृत उमेदवार श्री.छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील सैदापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन दि. 29 रोजी करण्यात आले होते. या सभेस महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनीही आपल्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांना सभेस उपस्थिती लावण्याबाबत सांगितले होते. युवराज पवार यांचा आदेश मिळताच दि. 29 रोजी जिल्ह्यातील झाडून सगळे मनसैनिक सातार्‍यात जमा झाले. यानंतर विराट शक्तीप्रदर्शन करीत हा जथ्था कराड, सैदापूरकडे मार्गस्थ झाला. महामार्गावरही वेगवेगळ्या गावांमधील मनसैनिक या रॅलीमध्ये सहभागी होतच होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मनसैनिक सभास्थानी उपस्थित राहीले. मनसैनिकांच्या या उपस्थितीमुळे पंतप्रधान मोदींच्या सभेला अधिकच झळाळी मिळाली आहे.
याबाबत बोलताना युवराज पवार म्हणाले, शिवछत्रपतींचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांना तमाम मनसैनिकांनी पाठिंबा दर्शवला असून उदयनराजेंना राज्यातच नव्हे तर देशात विक्रमी मताधिक्क्याने निवडून देवू. यासाठी माझ्यासह जिल्ह्यातील मनसैनिक सर्वतोपरी प्रयत्न करतील. उदयनराजेंचे सातार्‍यातील कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या विक्रमी विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली सभा आणि सभेस असलेली विराट गर्दी पाहून उदयनराजे हेच उद्याचे खासदार असतील, हे सांगायला कोणाचीही गरज नाही. मात्र, उदयनराजेंचा केवळ विजयच नव्हे तर विक्रमी मतांनी विजयासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.