अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरातून युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या इतर काही नेतेमंडळींनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळले आहे. यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रायगडावरून बोलताना भाजपाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
कार्यालयातच एका खासगी ठेकदाराचा वाढदिवस साजरा करुन त्यांनी नियमबाह्य काम केले असून या अधिकारी कर्मचार्यांवर शिस्तभंग आणि शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी निवेदनाद्वारे सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांच्याकडे केली आहे.
आ. महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी सोशल मीडिया तालुका अध्यक्षांना खालच्या स्तरावर जात धमकी आणि कुटुंबीयांना मारण्याचा इशारा दिला, हे निंदनीय आहे. याबाबत आ. महेश शिंदे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव येथील पत्रकार परिषदेत केली.
विडणी, तालुका फलटण येथे सुमारे 55 हजारांची चोरी केल्याप्रकरणी सहा जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अनाधिकृत मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवार पेठेतील किराणा दुकानातून दहा हजारांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.