मंगळवार पेठेतील किराणा दुकानातून दहा हजारांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : मंगळवार पेठेतील किराणा दुकानातून दहा हजारांची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवार पेठ, बोगदा येथील विजया किराणा स्टोअर्स या दुकानाच्या पाठीमागील दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने कशाने तरी उघडून दुकानात प्रवेश करून दुकानातील दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद विजया गणपती वजरीनकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली असून अधिक तपास पोलीस हवालदार भिंगारदेवे करीत आहेत.


