गोडोली येथे जुगार प्रकरणी पोलिसांनी धाड टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
तीन दिवस दारु पिवून काहीही न खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून पैसे घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता फसवणूक केल्याचा आरोप शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे (रा.वाई) यांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोप केला.
पोवई नाका, सातारा येथे हॉटेलची तोडफोड करत हर्षल चिकणे (रा. सातारा) याने वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रशांत जगताप यांच्यावर भ्याड हल्ला करुन त्यांना जखमी केले. या घटनेनंतर सातारा जिल्हा पत्रकार संघाने पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा दट्ट्या लावताच पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला.
लव्ह जिहाद, गोवंश हत्या, वाढते धर्मांतरण, देशातील महापुरुषांची होत असलेली विटंबना या विविध वाढत्या अपप्रवृत्तीच्या विरोधात साताऱ्यात वेगवेगळ्या हिंदुत्ववादी जनसंघटनाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध संघटनांचे हजारो प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कोणत्याही मिळकतींवर अवाजवी घरपट्टी आकारली जाणार नाही याची दक्षता सातारा विकास आघाडीने घेतली आहे.
आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.