आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2020 ते 11 ऑक्टोबर 2022 दरम्यानच्या कालावधीत तात्याभाऊ पोपट मोहिते वय 50, राहणार गरबड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांनी ऊसतोड कामगार पुरवण्याकामी बापूराव जगन्नाथ रणवरे राहणार शिंदे नगर तालुका फलटण यांच्याकडून पाच लाख साठ हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याने मजूर पाठवले नाहीत. म्हणून रणवरे यांनी पैशाची मागणी केली असता मोहिते यांनी एक लाख चाळीस हजार रुपये परत दिले आणि 4 लाख 20 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश न वठल्याने रणवरे यांनी मोहिते यांच्याकडे पैशाची मागणी केली असता मी पैसे परत देणार नाही, असे म्हणून रणवरे यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.


