maharashtra

चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लिंब, तालुका सातारा येथील रावसाहेब चव्हाण यांच्या घराजवळ असलेल्या सौरऊर्जेच्या लाईटच्या बंद असलेल्या खांबावरील बॅटरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैभव संजय पवार आणि बाबू उर्फ धनंजय देवकांत कदम (दोघेही राहणार लिंब, तालुका सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार परिहार करीत आहेत.